डाय डिझाईन…. अगदी सोप्या भाषेत ,

नवशिक्यासाठी

  • एखादा मीत्र शिकवतो तसं
  • सरळ
  • विना पांडित्य

अधीक जाणून घ्या

शीट मेटल प्रेस ऑपरेशन्स

प्रेस ऑपरेशन्स बरीच आहेत. आणि त्यांची प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे. पण त्यांच्यावर घट्ट पकड कशी मिळवावी ? डाय डिझाईनच्या संदर्भात त्यांचा विचार केला की सोपं जातं.

डाय डिझाईन

असं म्हणल्या जाते की डाय डिझाईन विज्ञान आहे आणि कला पण. म्हणून काय ते क्लिष्ट असावं ? मुळीच नाही . डिझाईन म्हणजे समस्या सोडविण्यासाठी विचार करण्याची एक विशिष्ठ पद्धत आहे.

वेगळ्या पद्धतीने विचार करणे , म्हणजेच सर्जनशीलता महत्वाची असणार आहे , शास्त्राच्या तात्विक बाबींचे सखोल ज्ञान नव्हे !

डाय टिप्स

एखादी गोष्ट सोप्या पद्धतीने करायला कोणाला आवडणार नाही ? टिप्स म्हणजे छोट्या-छोट्या युक्त्या. समस्या सोडविण्यासाठी अशा युक्त्या प्रभावीपणे वापरणे महत्वाचे असते.

केस स्टडीझ

हिमखंडाचे फक्त टोक समुद्राच्या पाण्याच्या वर दिसते , 67 टक्के भाग पाण्याखाली असतो. केस स्टडीचा अभ्यास केला की अदृश्य भागाबद्दल माहिती होते. गुपितं उघडी होतात. मूलतत्वे स्पष्टपणे दिसू लागतात. निरीक्षणांचे माहितीत रूपांतर होते व मतांचे तथ्यांमधे.